धम्मकार्याला गतिमान करण्यासाठी संघटित व्हा - राजरत्न आंबेडकर ★ पालांदूर येथे सत्कार व स्वागत सोहळा सपंन्न.


धम्मकार्याला गतिमान करण्यासाठी संघटित व्हा - राजरत्न आंबेडकर


★ पालांदूर येथे सत्कार व स्वागत सोहळा सपंन्न.

    

एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा - शील - करुणा आणि विज्ञान प्रणित दिलेल्या बौद्ध धम्मकार्याला गतिमान करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हा..!  असे पालांदूर (चौ.) येथील त्रिरत्न बुद्ध विहारांमध्ये आयोजित सत्कार व स्वागत सोहळ्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना सांगितले आहे .


लाखनी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर (चौरस) येथे दिनांक १२ डिसेंबर २०२२ ला पालांदूर , कवलेवाडा  , मेंगापूर येथील समता सैनिक दल आणि बौद्ध उपासकांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार आणि स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी त्रिरत्न बुद्ध विहाराततील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती प्रतिमांना       पुष्पहार अर्पण करून तसेच विहारासमोरील परिसरात बोधी वृक्षाला पुष्प वाहून , अगरबत्ती ,  मेणबत्ती लावून वंदन करून सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले ,  पाहुण्यांचे शाल , पुष्पगुच्छ व गुलाबपुष्प देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले पालांदूर नगरीमध्ये राजरत्न आंबेडकर यांच्या आगमनाचे उपस्थित संपूर्ण नागरिकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले , यावेळी भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना सांगितले की जगामध्ये बहुतेक बौद्ध देशांनी धम्म कार्याला गतिमान करून स्वतःच्या देशांची प्रगती साधलेली आहे , बुद्धाच्या धम्मकार्याममुळे प्रत्येक माणसाला संस्कार आणि जीवनाचे मूल्य व प्रज्ञा - शील - करुणा हे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची शिकवण दिली जाते , स्वतःची आणि इतरांची प्रगती करीत असताना सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले न्याय ,  हक्क प्राप्त करण्याकरिता व  ' शिका,संघटित  व्हा आणि संघर्ष करा...! " हे तत्त्वज्ञान जोपासण्या करिता तसेच धम्मकार्याला गतिमान करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हा..! असे मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भंडारा जिल्हा महासचिव भारतीय बौद्ध महासभा प्रा. युवराज खोब्रागडे,जिल्हा अध्यक्ष इंजिनियर रूपचंद रामटेके , जिल्हा प्रभारी राजेश बौद्ध , यांचेसह पालांदूर ,  कवलेवाडा ,  मेंगापूर येथील समता सैनिक दल पदाधिकारी,कार्यकर्ता,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,बौद्ध उपासक - उपासिका, नवयुवक मंडळी,विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !