खासदार संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर मधून च दे धक्का. ★ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश.

खासदार संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर मधून च दे धक्का.


★ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश.



ठाणे प्रतिनिधी : दशरथ कांबळे



नागपूर : संजय राऊतांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.नाशिक ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांचाही बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश.


 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या निवासस्थानी येऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच नाशिक ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नागपूरमध्ये बसूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत याना जोरदार धक्का दिला आहे. 


महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अपेक्षित असलेली कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यावर मात्र गेल्या पाच महिन्यात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेले या निर्णयामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झालो असल्याचे मत भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर जे काही आरोप प्रत्यारोप केले जातील त्याना कामातून उत्तर देऊ असेही चौधरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 


भाऊसाहेब चौधरी यांचे यावेळी पक्षात स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्याच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून गेली कित्येक वर्ष शिवसेनेत कार्यरत असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांचा प्रवास सर्वसामान्य विभागप्रमुख पदापासून ते डोंबिवली शहरप्रमुख आणि त्यानंतर नाशिक संपर्कप्रमुख अशी पदे भूषवली आहेत. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित असून त्यांच्याकडून यापूढे देखील उत्तम काम घडेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 


यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, ठाणे जिल्हाप्रमुख आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे,कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हेदेखील उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !