दारू नको दूध प्या.

 


      दारू नको दूध प्या.


एस.के.24 तास


धानोरा : मुक्तीपथ धानोरा शहर संघटनेच्या वतीने व जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी  यांनी धानोरा शहरात दुधाचे वाटप केले नवीन वर्षाच्या आनंद उत्सव साजरा करतांना अनेक तरुण व प्रौढ सुध्दा नवीन वर्षाच्या पार्शवभूमीवर पार्टी करतात प्रामुख्याने या मद्ये दारू पिले जाते त्यामुळे या  दिवशी  अनेक अपघात महिला हिंसाचार ह्या घटना बघायला मिळतात अनेक महाविद्यालयातील मुले नव्याने ह्या दिवशी  दारू पितात  आणि आपले उज्वल भविष्य बरबाद करतात.

 धानोरा शहरात दुधाचे वाटप करून त्याचे महत्व पटवून देत दारू नको दूध प्या हा संदेश संपूर्ण जिल्हा वासियांना दिला दिला यावेळी शहर संघटनेचे अध्यक्ष,सुनीताताई कूमरे भारतीय स्टेट बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक,ज्ञानेश्वर दाने मुक्तीपथ तालुका संघटक,अक्षय पेद्दीवार तालुका प्रेरक भास्कर कड्यामी मुक्तीपथ कार्यकर्ते राहुल महाकूलकर  शुभम बारसे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !