पिंपळगाव (सडक) येथे बकर्यांची चोरी.
★ १ लक्ष २ हजाराचा माल लंपास.
■ एस.के.24 तास
भंडारा : लाखनी तालुक्यातील पिंपळगाव / सडक येथे घराला लागून बंद गोठ्याचा मागिल बाजुचा कुलुप व साखळी तोडुन गोठ्यात असलेल्या १० शेळ्या २ बोकड व १ पाटरू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. २) पहाटे २.०० वा. उघडकीस आली. यात विलास तुकाराम शेंडे या शेळीमालकाचे सुमारे १ लक्ष ०२ हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
सद्यस्थितीत शेती परवडेनासी झाल्याने पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन केल्या जाते. विलास तुकाराम शेंडे यांच्याकडे ११ शेळ्या व २ बोकड होते. गुरुवारी (ता. १) ला रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात असलेल्या शेळांचा चारा –पाणी करून ९ वाजताच्या सुमारास गोठ्याशेजारी असलेल्या घरी झोपी गेले. रात्री २ वाजताच्या सुमारास विलास शेंडे यांना जाग आली तेव्हा ते घराला जोडुन असलेल्या गोठ्याकडे गेले. तेव्हा त्यांना बंद गोठ्याचा मागिल बाजुचा कुलुप व साखळी तुटली असल्याचे दिसून आले व गोठ्यात बांधलेल्या शेळ्या,बोकड दिसले नाही लगेच त्यांनी शोधाशोध केली परंतु काही न दिसल्याने त्यांनी घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली.
तेव्हा गस्त ड्यूटी वर असलेले पोलिस हवालदार निलेश रामटेके व पोलिस शिपाई स्वप्नील कहालकर यांनी पहाटेच घटनास्थळी येवून शोधाशोध केली.यात शेळी मालकाचे सुमारे १ लक्ष २ हजार रुपयाची जनावरे चोरून नेल्याने नुकसान झाले आहे.लाखनी पोलिसांनी शेळी मालक विलास तुकाराम शेंडे यांच्या फिर्यादीवरुण अज्ञात चोरट्याविरुद्ध अप.क्र. २५९/२०२२ कलम ३८० भादवी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके करीत आहेत. वृत्त लिहीपर्यन्त शेळयांचा शोध लागला नव्हता.