गडचिरोली पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदारस लाच घेताना अटक.

गडचिरोली पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदारस लाच घेताना अटक.

एस.के.24 तास



गडचिरोली : अटक करून जेलमध्ये न पाठवण्याचे व त्यास जमानत देण्याच्या कामाकरिता 3 हजार 500 रुपयांची लाच स्विकारताना गडचिरोली पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार शकील बाबू सय्यद (50) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवार 3 डिसेंबर रोजी रंगेहात पकडले आहे. सदर कारवाईने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आतेभावास गुन्ह्यात अटक करुन जेलमध्ये न पाठवण्याचे व त्यास जमानत देण्याच्या कामाकरिता गडचिरोली येथील पोलीस हवालदार यांनी 3 हजार 500 रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दाखल केली.



तक्रारीच्या आधारे सापळा रचला असता पोलीस स्टेशन गडचिरोली येथील तपास कक्षामध्ये शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी पोलीस हवालदार शकील बाबू सय्यद यांना तक्रारदाराकडून 3 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे कल भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे,नापोशी राजू पदमगिरीवार,श्रीनिवास संगोजी, पोशी किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, मपोशी विद्या म्हशाखेतत्री व चालक पोलीस सवालदार तुळशीराम नवघरे यांनी केली आहे. सदर कारवाईने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !