उद्या धनगर समाजाचा मेंढ्यासह गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयातील धनगर संघटनांच्या वतीने झाडे, झाडया या जातीने बोगस जातीचे दाखले घेऊन धनगर समाजाचे सवलती लाटत असल्याने जातीचे दाखले रद्द करावे, नोकरीत असणाऱ्यांना बडतर्फ करावे, वनक्षेत्रात शेळ्या मेंढ्या चराईस परवानगी द्यावी या मागण्या घेऊन धनगर समाज संघटनांच्या वतीने मेंढ्यांसह मेंढपाळ आक्रोश मोर्चा 26 डिसेंबर ला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्यातील झाडे कुणबी यांनी शासनाची दिशाभूल करीत खोट्या कागदपत्रांचे आधारे धनगर भटक्या जमाती क चे जातीचे दाखले काढून नोकरी व इतर सवलती लाटत असल्याने ती जातीची दाखले,जातवैधता प्रमाणपत्र रद्द करावे व त्याआधारे नोकरी बळकावऱ्याना बडतर्फ करावे,धनगर समाजाचा मूळ व्यवसाय शेळ्या मेंढ्या पाळणे हे असल्याने वनक्षेत्रात चराईस परवानगी द्यावी या प्रमुख मागण्या घेऊन मेंढपाळ आक्रोश मोर्चा गांधी चौक ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मेंढ्यांसह काढण्यात येणार आहे.
या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ.तुषार मर्लावार व धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, धनगर महासंघ महाराष्ट्र राज्य,जय मल्हार सेना,अहिल्यावाहिनी धनगर समाज संघटना, धनगर जमात संघटना चंद्रपूर,अखील भारतीय मौर्य क्रांती सेना,महाराणी अहील्यादेवी प्रबोधन मंच, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनाझेशन यांनी केले आहे.