उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजुरा तील त्या पोलीसांनवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी - सुरज ठाकरे
एस.के.24 तास
चंद्रपूर : राजुरा पोलीस स्टेशन हे नेहमीच काही ना काही कारणाने वादामध्ये राहत आलेले आहे .यात नुकताच घडलेला प्रकार म्हणजे राजुरा पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यांचा जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ रोहित बत्ताशंकर यांनी काढला होता .ही माहिती मिळताच संदीप बुरडकर या पोलीस शिपायाने प्रभारी ठाणेदार संतोष दरेकर यांच्या सांगण्यावरून त्याला बोलावले मारहाण केली व त्याचा मोबाईल हीसकला याची तक्रार सुरज ठाकरे यांच्या मध्यस्थीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्यापर्यंत गेल्यानंतर या विरोधामध्ये वृत्तपान पत्रांमध्ये बातम्या तसेच सोशल मीडियावर बातम्या आल्यानंतर त्याचा मोबाईल त्याला परत करण्यात आला.
परंतु झालेला प्रकार हा गुन्हा असून प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर व संदीप बुरडकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत या प्रकरणाला न्याय मिळणार नाही. अशी भूमिका घेत सुरज ठाकरे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अधिवेशना दरम्यान या बाबत तक्रार केली असून. दोन ते तीन दिवसांमध्ये यावर काही तोडगा न निघाल्यास या विरोधामध्ये न्यायालयांमध्ये याचिका दाखल करणार, तसेच आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका सुरज ठाकरे व पीडित रोहित याने घेतली आहे.अधिवेशनादरम्यान करण्यात आलेले तक्रारी संदर्भात शासन सतर्क असल्याने आता यावर गृहमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.