सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात यावे. ★ वन मंत्र्यांना निवेदन द्वारे केली ग्रा.पं.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते,राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.



सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात यावे. 


★ वन मंत्र्यांना निवेदन द्वारे केली ग्रा.पं.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते,राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


सावली : तालुक्यात एकाच आठवडयात वाघाच्या हल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. कैलास लक्ष्मण गेडेकर वय 47 वर्षे निलसनी पेडगाव.व बाबुराव बुधाजी कांबळे वय 60 वर्षे रुद्रापुर अशा अनेक घटणा तालुक्यातील होत असल्याने जनता भयभीत झाली असून वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली जीवन जगत आहे. तालुक्यातील बहुतांश गावे ही जंगलालगत असल्याने शेतीसुध्दा जंगलालगतच आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. दिवसेंदिवस वन्यजीव व मानव संघर्ष वाढीस लागला असून वन्यप्राण्यांच्या हल्यात अनेकांचे बळी जात आहेत.


 त्यातच वन्यप्राण्यांकडुन शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांना मा.तहसीलदार पाटील साहेब व मा.आर.एफ.ओ.विरुटकर साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे तरी वरील विषयांकीत बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करुन सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन जंगल गावालगत तार कंपाऊंड व सौर ऊर्जेचा वरील सौर दिवे लावण्यात येवुन तालुका वासीयांचे संरक्षणाच्या दृष्टीने वेळीच उपायोजना करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे यावेळी उपस्थित श्री. दादाची पा.किनेकार ग्रामपंचायत उपसरपंच साखरी.खोजिंद्र येलमुले.पुण्यनगरी प्रतिनिधी कवठी हे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !