मा.खा.अशोकजी नेते,चिमुर - गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांनी वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या घरी सांत्वनपर भेट दिले.

मा.खा.अशोकजी नेते,चिमुर - गडचिरोली लोकसभा क्षेत्र  यांनी  वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या  व्यक्तींच्या घरी  सांत्वनपर भेट दिले.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यात या हफ्त्यात अनुक्रमे नीलसनी पेठगाव,रुद्रापूर व खेडी येथे वाघाच्या हल्यात निर्दोष व्यक्तींचा जीव गेला.सर्वत्र हाहाकार उडाला.जन सामान्याचे जीवन विस्कळीत आले.सकाळ आणी संद्याकाळी वाघाच्या भीतीमुळे दहशतीमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले.विदयार्थी,शेतकरी बेहाल झाले.जंगल व ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.तालुक्यात वाघानी हल्ला केलेल्या संदर्भात मा.खा.अशोक जी नेते  यांनी वन  विभागातील अधिकारी यांची गोसेखुर्द रेस्टहाऊस  सावली येथे बैठक घेतली त्यात श्री.खाडे (डी.फ.ओ) चंद्रपूर व श्री.विरुटकर (आरफओ,सावली यांना वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी  सूचना दिल्या.


 गावशिवारात कोणत्याही वन्यप्राण्यांची घुसखोरी व त्यामुळे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी लवकरात लवकर वनविभागातर्फे उपाय योजना करण्याचे सांगितले व कुटुंबाना त्यांनी सांत्वना देत आधार दिला.निलसनी पेटगांव येथील किनेकार, रुद्रापूर येथील श्री.बाबुराव कांबळे,खेडी येथील सौ.स्वरूपा येल्लटीवार वाघाच्या हल्यात मृत पावले होते.


आज त्यांचा कुटुंबाना त्यांनी भेट देत आधार दिला. तथा रुद्रापूर खेडी,येथे भेटी दरम्यान उपस्थित अविनाश पाल भा ज पा ता अध्यक्ष सावली,सतीश बोम्मावार भा.ज.पा ता महामंत्री तथा नगरसेवक सावली,सौ निलमताई सुरमवार भा ज पा महीला जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवीका सावली,सौ छायाताई शेंडे माजी उपसभापती प स सावली, आशिष कार्लेकर भा ज पा शहर अध्यक्ष सावली,निखील सुरमवार,गित्तेश चिताडे,व त्या गावातील स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच ठाणेदार बोरकर साहेब व वनविभागाचे अधिकारी वर्ग,गावातील लोक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !