उच्च न्यायालयाने राजुरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेला तो गुन्हा केला अखेर रद्द - सुरज ठाकरे यांना मोठा दिलासा.
एस.के.24 तास
राजुरा : २३ एप्रिल २०२२ रोजी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणाच्या वादा वरून मुंबई येथे झालेल्या राड्याचे प्रसाद राजुरांमध्ये सुरज ठाकरे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या स्वरूपामध्ये देखील म्हटले त्यावेळी सुरज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट टार्गेट करत आक्षेपार्य भाषेचा वापर केल्याने त्यांच्यावर शिवसेनेचे(उद्धव ठाकरे गट)राजुरा तालुकाप्रमुख यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस स्टेशन येथे सुरज ठाकरे यांच्यावर कलम १५३(अ) अंतर्गत अपराध क्रमांक १७१/२०२२ दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यात सुरज ठाकरे यांना यश प्राप्त झाले होते.
सुरज ठाकरे यांनी सदर दाखल गुन्हा हा राजकीय दबावव द्वेषा पोटी खोट्या कलमांतर्गत दाखल केल्याचा आरोप करीत या गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा रद्द करण्याकरता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे एडवोकेट अल्पेश देशमुख व ॲडव्होकेट देशपांडे यांच्या माध्यमातून अपील दाखल केली होती गेल्या चार ते पाच महिन्यांपासून याची सुनावणी सुरू होती वारंवार तक्रार कर्त्याला आपली बाजू मांडण्याकरता बोलाविण्यात आले.परंतु शिवसेनेचे तालुकाध्यक्ष हे उच्च न्यायालयांमध्ये सुरज ठाकरे यांच्या विरोधामध्ये कुठलेही सबळ पुरावे देऊ शकले नाही. तसेच उच्च न्यायालयाच्या बोलावण्यावर न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याकरिता आलेच नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सूरज ठाकरे यांच्या विरोधामध्ये दाखल असलेला गुन्हा हा कायमस्वरूपी रद्द केला असल्याने युवा स्वाभिमान गटात आनंदाचे वातावरण आहे व शेवटी दडशाहीच्या राजकारणातून दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून मुक्तता होऊन गुंडांना चपराक मारली आणि सत्य अखेर जिंकले व लवकरच मानहानीचा दावा हा पोलीस प्रशासन व तक्रारकरते यांच्यावर दाखल करणार असे सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे व त्यांनी उच्च न्यायालयाचे आभार या ठिकाणी मानले आहे.