सावली ते घोडेवाही रस्त्याचे काम निकृष्ट प्रमोद कन्ट्रक्शन कम्पनीचा प्रताप.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
सावली : सावली ते घोडेवाही या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम २ वर्षांपूर्वी करण्यात आले मात्र काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अल्पावधीतच डांबरतुन गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व प्रमोद कन्ट्रक्शन या बांधकाम कम्पनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन २०१८-१९ सावली ते कोंडेखल प्रजिमा २८ या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरणाला मंजुरी मिळाली.
रस्त्याच्या बांधकामाची अंदाजित किंमत ५ कोटी ६७ लक्ष रुपये होती. बांधकामाला सुरुवात होऊन २०२१ मध्ये पूर्ण झाले परंतु डांबराच्या रस्त्यात डांबरचा वापर कमी करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले त्यामुळे गिट्टी बाहेर निघत आहे. यामुळे सायकल, दुचाकी स्लिप होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रस्त्याचे काम झाले परंतु तेही निकृष्ट झाल्याने याची चौकशी करून संबंधित अभियंता व प्रमोद कन्ट्रक्शन प्रा. ली.वडसा कम्पनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कामाच्या दोष दुरुस्तीची जबाबदारी ५ वर्षापर्यंत संबंधित कंत्राटदारांची आहे. याच कंत्राटदाराकडे असलेले सावली -मेटेगाव रस्त्याचे काम सुद्धा याच प्रकारचे झाले असून संबंधित विभागाकडे कळवूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांची मिलीभगत आहे.विजय कोरेवार - माजी सभापती सावली