घोडेवाही येथे हिऱ्याची खाण ; या' घरातील चुलीखाली दडलाय मौल्यवान खजिना.

घोडेवाही येथे हिऱ्याची खाण ; या' घरातील चुलीखाली दडलाय मौल्यवान खजिना.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास



सावली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर जिल्ह्यात सोने, चांदी,तांबे,यासारखे दुर्मिळ धातू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.या चर्चेला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही.अशातच जिल्ह्यातील एका गावात हिऱ्याची खाण असल्याचं संशोधनातून समोर आलं होत.या खाणीचा केंद्र चक्क घरातील चुलीच्या खाली आहे.या खाणीचे उत्खनन करण्यासाठी आता ग्रामपंचायत सरसावली आहे. हे गाव  चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील घोडेवाही  असे गावाचे नाव आहे.


भूगर्भ वैज्ञानिकांनी १९९७ - ९८ मध्ये सावली तालुक्यातील घोडेवाही व पाथरी येथे संशोधन केले.या संशोधनात हिऱ्यांचा साठा असल्याचं सांगितलं होत. घोडेवाही गावातील ज्ञानेश्वर तिवाडे यांच्या घरातील चूल केंद्रस्थान ठरली होती.सुमारे पाच किलो मीटरच्या परिसरात हिऱ्यांचा साठा असल्याच संशोधकांनी ग्रामस्थांना सांगितलं होत. जवळपास दीड महिने संशोधकांनी गावात ठाण मांडलं होतं.गावाच्या भूगर्भात हिऱ्याची खाण असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली होती.त्यानंतर जमिनीचे भावही वधारले होते.या संशोधनाला पंचवीस वर्षाच्या काल उलटला.मात्र हिरे बाहेर काढण्यासाठी कुठलीच हालचाल झालेली नाही.आत्ता खोदकाम कराच घोडेवाही येथे झालेल्या संशोधनानंतर गावात उत्साह पसरला होता. 

खदान सुरू झाली असती तर अनेकांना रोजगार,जमिनीला भाव मिळाला असता.मात्र खदान सुरू झाली नाही.या संदर्भात घोडेवाही चे उपसरपंच चेतन रामटेके यांच्याशी एस.के.24 तास चे मुख्य संपादक,सुरेश कन्नमवार यांनी संपर्क साधला असता ते म्हणाले.खदान सुरू व्हावी यासाठी ग्रामपंचायत ठराव घेणार आहे.ही खदान आमच्या गावाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे.त्यामुळे पूर्ण ताकदनिशी आम्ही प्रयत्न करू असे ते सांगितले. 


काय म्हणतात अभ्यासक...


गेल्या १५ व्या शतका पासून वैरागड,गडचिरोली परिसरात हिरे आढळले होते.इंग्रजांनी पण इथे उत्खनन केले.पण मुबलक हिरे आढळले नाहीत.जी.एस.आयने सुद्धा इथे सर्वेक्षण केले.परंतु प्रमाण अधिक नसल्याचे आढळले काही वर्षापूर्वी GSIच्या संशोधकांनी बस्तर क्रॅटन म्हणून संबोधले जाणाऱ्या सावली,गोंडपिंपरी ,वैरागड ह्या भागात हिऱ्याचे अंश,कोग्लोमिरेट, निस या खडकात आढळतात असा रिसर्च पेपर २००१ मध्ये प्रसिद्ध केला होता.परंतु व्यावसायिक दृष्ट्या किंवा खाणी होईल इतके साठे आपल्या भागात नसल्याच्या रिपोर्ट दिला होता,असं सुरेश चोपणे,भूशास्त्र अभ्यासकांनी म्हटलं आहे.


हिऱ्यासाठी झाले युद्ध...


विभाजन पूर्व चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड या परिसरात हिराच्या खाणी असल्याची नोंद इतिहासात सापडतात. त्यासाठी युद्धही झाले आहेत. ब्रिटिश काळातसुद्धा हिरे काढण्याचा प्रयत्न झाला होता.वैरागड परिसरात आजही त्याचा खाणाखुणात दिसतात.याच परिसराला लागून सावली तालुका येतोय.


का म्हणतात चंद्रपुरला जिओलॉजीकल म्युझियम..?


चंद्रपूरच्या भुगागाला जिओलॉजीकल म्युझियम असे संबोधले जाते.कारण चंद्रपुरात सापडणारे खडक भारतात क्वचितच आढळतात.इथे अग्निज रूपांतरीत खडक,धातू,खनिजे आणि जिवाष्मे आढळतात.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !