जय संघर्ष वाहन चालक मालक यांचा अधिवेशनावर मोर्चाचे आवाहन.




जय संघर्ष वाहन चालक मालक यांचा अधिवेशनावर मोर्चाचे आवाहन.


एस.के.24 तास


सावली : ई चालान ऐवजी ऑफलाईन चालान आकारावे, खासगी वाहन चालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख व मृत्यू झाल्यास 25 लाखांची आर्थिक मदत द्यावी, दलित व आदिवासी संरक्षण कायद्या प्रमाणे वाहन चालकास होणाऱ्या मारहानीला आळा बसवा यासाठी कायद्यामध्ये कठोर कार्यवाहीची तरतूद करण्यात यावी, देशातील पर्यटन व धार्मिक स्थळी चालकांच्या विश्रांतीची सोय करण्याची तरतूद करण्यात यावी,




वाहन चालकासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना कार्यान्वित करावी व 30 हजार वरून एक लाख रुपये पर्यंत तरतूद करण्यात यावी अशा विविध समस्याच्या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था तर्फे उद्या दि. 20 डिसेंबर ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येत आहे.


 या करिता महाराष्ट्र जिल्ह्यातील खासगी वाहन चालक मालकांनी जास्तीत जास्त सख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर टोंगे महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रसार प्रमुखांनी केला आहे.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !