शा.औ.प्र.संस्थेत तीन दिवसीय तारुण्यभान शिबिर संपन्न.

शा.औ.प्र.संस्थेत तीन दिवसीय तारुण्यभान शिबिर  संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तीन दिवसीय तारुण्यभान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्मशाळेच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे होते. तर मार्गदर्शक म्हणून सर्च संस्थेचे  ज्ञानेश्वर पाटील ,सौ. सुनंदा खोरगडे ,  राजेंद्र ईसासरे ,  मुक्तिपथ चे अमोल वाकुडकर लाभले होते. संस्थेचे गट निदेशक भास्कर मेश्राम, केशव डाबरे,आनंद मधुपवार, बंडोपंत बोढेकर, नितीन श्रीगिरीवार, प्रबंधक प्रभाकर बुल्ले आदींची  प्रमुख उपस्थिती होती.  सर्च संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांना प्रामुख्याने जीवन शिक्षणाचे धडे, लैंगिक शिक्षण शंका- समाधान मार्गदर्शन , व्यक्तिमत्व विकास,  भारताचा सक्षम नागरिक कसा असावा या संदर्भात संवाद - प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले. तारुण्यभान शिबिराची गरज आजच्या प्रत्येक युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.  प्राचार्य संतोष साळुंके  यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या  उपक्रमाचे कौतुक करून प्रशिक्षणार्थ्यांनी या शिबिरात दिलेल्या जीवनविषयक विचारांचे आचरण करावे,असे आवाहन त्यांनी केले.गटनिदेशक बंडोपंत बोढेकर  यांनीही याप्रसंगी समायोचित विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीशचंद्र भरडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मिना गांगरेड्डीवार यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात  गेल्या सत्रात  खरपुंडी येथे संपन्न झालेले  ग्रामीण श्रमसंस्कार शिबिरात  सहभागी झालेल्या शिबिरार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . शिबिरात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती संबंधी कार्यक्रम अधिकारी  भास्कर मेश्राम यांनी याप्रसंगी माहिती दिली . विशेष प्राविण्य प्राप्त शिबिरार्थ्यांचे याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !