मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अर्तंगत जागतिक स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला.

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अर्तंगत  जागतिक स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला.


एस.के.24 तास


चामोर्शी : दि.५ डिसेंबर २०२२ म्हणजे जागतिक स्वयंसेवक दिन या दिनाच्या निमित्ताने मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अर्तंगत चामोर्शी तालुक्यातील विविध गावात जागतिक स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला. या मध्ये गावातील पदाधिकारी यांनी मॅजिक बस संस्थेच्या कामा बद्दल मनोगत व्यक्त केलेले आहे, सोबतच प्रत्येक गावात गावाच्या हितासाठी  स्वयंसेवक का बर आवश्यक आहे आणि मॅजिक बस संस्थेते सोबत  एक  Community Youth Leader  म्हणून आणि आता एक मॅजिक बस कर्मचारी म्हणून काम करत असणाऱ्या युवा मार्गदर्शक यांनी सुधा गावातील विकासासाठी स्वयंसेवक म्हणून काय जबाबदारी असायला पाहिजे.


 आणि का आवश्यकता आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले आहे.सोबतच मॅजिक बस  संस्थेते सोबत विविध गावात जुडलेले स्वयंसेवक यांनी देखील मॅजिक बस संस्थेते सोबत काम करतांना त्यांच्या गावात आणि त्यांच्यात झालेला व्यक्तीमहत्त्व विकास याबद्दल मनोगत व्यक्त केलेले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे सर,तालुका प्रमुख मा.योगीता सातपुते मॅडम सोबतच युवा मार्गदर्शक - प्रफुल निरूडवार,रोशन तिवाडे,दिपक ठपकस,पंकज शंभरकर,अश्विनी उराडे,सोनी शिऊरकार,तसेच शाळेतील शिक्षक गावातील सर्व पदाधिकारी,पालक, गावातील स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !