पहार्णी परिसरात दहशत निर्माण करणारा वाघ पकडण्यात यश.

पहार्णी परिसरात दहशत निर्माण करणारा वाघ पकडण्यात यश.


★ एस.के.24 तास


नागभीड : ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी व नागभिड वनपरिक्षेत्रातील शेतशिवार परिसरात धुमाकुळ घालत असलेल्या P-2 वाघास (नर) या वाघास दुपारी 2.12 वाजता डार्ट केला व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास दुपारी 2.38 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले.

                  विशेष म्हणजे, नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पहार्नी बिटातील गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जंगलालगतच्या शेतात काम करायला गेलेली मृतक सुमित्रा वासुदेव कुंबरे वय (50) शेतात गवत कापत असणाऱ्या सदर महिलेवर याच वाघाच्या बड्यांनी हल्ला करून महिलेला ठार केले होते.


 तर नागभीड वनपरिक्षेत्रातील हुमा (खडकी) चे वनरक्षक बुरले यांच्या आईला सुद्धा या वाघाच्या बछड्यानी तोरगाव मधील त्यांच्या शेतात जखमी केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडलेली होती. प्रत्यक्षदर्शीनुसार महिलेला हल्ला करून ठार मारणाऱ्या मध्ये तेच वाघाचे दोन बछडे असल्याची चर्चा आहे. तरी यामुळे परिसरात सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे व धान कापणी याकरिता शेतकऱ्यांना शेताचे काम करायला जंगलात असलेल्या शेतामध्ये जावे लागते त्यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरलेले होते. तरी वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा असे परिसरातील लोकांनी मागणी केलेली होती.    

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !