मॅजिक डे निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
★ 36 विद्यार्थिनी केले रक्तदान व 132 युवानी दिली मॅजिक प्रवेश परीक्षा.
एस.के.24 तास
चिमुर : मॅजिक अध्ययन केंद्राची स्थापना होऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून मॅजिक परिवार व ब्राईटएज फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी डॉ. रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल, भिसी येथे करण्यात आले होते.मॅजिक अर्थातच मातोश्री अकॅडमी गायडन्स इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अँड ट्रेनिंग सेंटर यांची स्थापना दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आली होती.
मॅजिक अध्ययन केंद्राच्या माध्यमातून परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत निवास भोजन व वाचनालय उपलब्ध करून देण्यात येते. या समाजपयोगी उपक्रमाला 3 वर्षे पूर्ण झाली असून या केंद्रातून आदिवासी विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवेसाठी निवड झालेली आहे. या दिनाच्या औचित्य साधून लाईन रक्तकेंद्राचे माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल 36 दात्यांनी रक्तदान केले.
या याच दिवशी मॅजिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यात 138 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून जास्तीत जास्त 15 विद्यार्थ्यांची निवड मॅजिक साठी करण्यात येणार आहे. मॅजिकच्या निर्मितीमध्ये या केंद्रातील पहिल्या तुकडीचे सर्वात मोठे योगदान असल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी त्या राहुल जांभुळे आपले मनोगतही व्यक्त केले.
या प्रसंगी मॅजिक उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे,प्रा.भगवान ननावरे,डॉ.हर्षल नन्नावरे, डॉ. शिल्पी,ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे,विद्यार्थी संघटनेचे राज्यध्यक्ष राहुल दडमल,संदीप खडसंग,वाल्मीक नन्नावरे,विलास चौधरी,विवेक चौके, नितेश श्रीरामे,प्रफुल भरडे,मोरेश्वर जांभूळे व रितू श्रीरामे हे प्रामुख्याने उपस्थित होते.