मेंढपाळ आक्रोश मोर्चा 26 डिसेंबर ला होणार. ★ सावली बैठकीत मोर्चाचे नियोजन.

मेंढपाळ आक्रोश मोर्चा 26 डिसेंबर ला होणार.


★ सावली बैठकीत मोर्चाचे नियोजन.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : दिनांक,14/12/2022 बुधवार ला सावली येथे धनगर - कुरमार समाजाचे वतीनेबोगस धनगर  झाडे कुणबी बोगसपणे धनगर व तत्सम प्रवर्गात झाडे नाम सदुश्य जातीत घुसखोरी करून बोगस धनगर जातीचे जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी बडकवीत असल्याने त्यांना रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आंदोलन नियोजन बैठक पार पडली.तसेच तहसीलदार, पाटील तहसील कार्यालय,सावली यांना निवेदन देण्यात आले.बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.


तहसीलदार,पाटील तहसील कार्यालय,सावली यांना झाडे कुणबी बोगसपणे मुळ धनगर व तत्सम प्रवर्गात जातीत घुसखोरी करीत असल्याने निवेदन देताना...

डॉ.तुषारभाऊ मर्लावार,डॉ.नारायणजी करेवार,  माजी पं.सभापती,विजय कोरेवार,सेवानिवृत्त सपोनि ओगेवार साहेब,विस्तारीजी फेबुलवार साहेब,संजय कन्नावार,खेडी,चांदली बुज,चांदपुर, जुनासुर्ला,रामाळा,कोटगल येथील समाज बांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती.




मोर्चाचे नाव - मेंढपाळ आक्रोश मोर्चा  


मोर्चा दिनांक व वेळ - 26 डिसेंबर 2023 सोमवार ला  दु.12 .वाजता.


मोर्चाचा मार्ग - सायन्स कॉलेज चामोर्शी रोड ते गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली.


मोर्चाचे स्वरूप - महिला,पुरुष व मेंढ्यांसह.


मागण्या : - 1) बोगस झाडे कुणबी जातीची घुसखोरी थांबवा.


2) शेळ्या मेंढ्या चराईस परवानगी द्या.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !