चकपिरंजी गावात जिवघेणारा खट्टा सात महिने होऊन सुध्दा पदाधिकारी यांचे दुर्लक्ष.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील चकपिरंजी गावातील वार्ड नंबर-2 हनुमान मंदिर जवड मागील सात महिन्या पासून या ठिकाणी नालीवरील सिमेंटची असलेली पाटि फुटलेली आहे. हि गोष्ट वारंवार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता पुर्ण करणार अशी उडवा उडविचे उत्तरे मागील सात महिन्या पासून मिडत आहे परंतू त्या कामाला अजून पर्यंत सुरूवात झालेली नाही त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांच्या प्रयत्नातून छोटे दगड आणि मुरूम ग्रामपंचायत अंर्तगत तातपुरता टाकण्यात आलेला आहे परंतु वाहतुकी मुळे परत तीथे मोठा खट्टा होत आहे त्यामुळे कोणतीही जिवीत हानी होऊ नये त्यासाठी लवकरात लवर त्या कामाला सुरूवात करावी अशी मागणी गावातील नागरिकांन कडून होत आहे.