कोरची पंचायत समिती मध्ये चालतो मनमानी कारभार.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम, व अतिदुर्गम भागातील शेवटच्या टोकावर अस्तित्वात आलेली कोरची पंचायत समितीमध्ये कुणी, कुणाचे ऐकतंच नसल्यामुळे जो, तो, एकमेकाकडे बोटे दाखवून कार्यालयात कामानिमित्य आलेल्या प्रत्येक गरजू माणसांची दिशाभूल केली जातं असल्याचे सांगितले जातं आहे. कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हम करे सो कायदा या मनमानी वृत्तीमुळे या परिसरातील कित्येक गरीब,निराधार, माणसे कामा अभावी पिचली जात आहे.
या परिसरात होत असलेल्या विकास कामाचा खेळ खडोबा होताना दिसत आहे.पंचायत कर्मचाऱ्यांच्या मनमानी,व हुकमतशाही वृत्ती मुळे दिवसेंदिवस कोरची पंचायत समिती समस्याचे माहेर घर बनताना दिसत आहे.पंचायत प्रशासनानी स्वतः पुढाकार घेऊन कोरची पंचायत समिती मध्ये सुधारणा करुन कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या न्याय देण्यात यावा स्वच्छ प्रशासनाची सुरुवात स्वतःपासुन करावी.