दुचाकी ची झाडाला धडक ; एक ठार,एक जखमी.

दुचाकी ची झाडाला धडक ; एक ठार,एक जखमी.


एस.के.24 तास


गोंदिया : तालुक्यातील कलचुहा ते चिचगड मार्गावर मोटारसायकलवरून चालकाचा नियंत्रण सुटला. मोटरसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना २१ नोव्हेंबर रोजीची आहे. शंकर रोहीत साफा (२५) असे मृतक तर नारद नारायण पडोती (२४) दोन्ही रा. मेहताखेडा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.


सविस्तर असे की,मृतक शंकर साफा व त्याचा मित्र नारद हे मोटारसायकल क्र. सीजी. ०८/टीसी-
१६७ ने मेहताखेडावरून जात असतांना कलचुहा ते चिचगड मार्गावर परसटोला येथे नातेवाईकाच्या घरी थोड्यावेळ थांबल्यानंतर ते पुन्हा गावी जाण्यासाठी निघाला.


 दरम्यान कलचुहा गावाजवळ दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने शंकरची दुचाकी झाडाला जावून आदळली. यामध्ये दोन्ही गंभीर जखमी झाले. जखमीला देवरी येथील रुग्णालयात नेले असता शंकरला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर नारदला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. 


देवरी पोलिसानी २७९, ३३८, ३०४ (अ) भादवी सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ऊरकुडे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !