अतिक्रमधारकांची तहसिल कार्यालयात गर्दी.
★ सरकारी जागेवरील निवासाची घरे हटविण्याचे विरोधात निवेदने सादर.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास
सावली : अनेक पिढ्यांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने धास्तावलेल्या अतिक्रमनधारकांनी तहसिल कार्यालयात दिवसभर गर्दी अतिक्रमण हटवू नये अशा मागणीचे निवेदन पेंढरी,मुंडाळा,चारगाव,चकपिरंजी,खेडी,पाथरी, भारपायली येथील अतिक्रमनधारकांनी तहसीलदार सावली यांचेकडे निवेदने दिले.
सावली तालुक्यातील १४ गावातील ४६४ कुटुंब अनेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत आहेत परंतु नुकतेच तहसीलदार सावली यांचेकडून सदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली असून २२ नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे यामुळे अतिक्रमनधारक धास्तावले आहेत. सदर जमिनीवर पक्के घरे बांधकाम झालेले आहे, त्याच जागेवर शासनाकडून आवास योजनेची घरकुल बांधकाम झालेले आहे, त्याच वस्तीत शासकीय योजनेतून रस्ते, नाली व शासकीय इमारतीचे बांधकाम झालेले आहेत मात्र नुकतेच तहसिलदार सावली यांनी नोटीस पाठविल्याने अतिक्रमनधारकांवर बेघर होण्याची पाळी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवू नये असे निवेदन तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील अतिक्रमनधारकांनी दिवसभर गर्दी करीत निवेदने दिले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती,विजय कोरेवार, चकपिरंजीचे सरपंच उषा गेडाम,पाथरीचे सरपंच,अनिता ठिकरे,उपसरपंच प्रफुल तुम्मे,चारगावचे सरपंच ज्योती बहिरवार,लखन मेश्राम,श्रीकांत बहिरवार,नगरसेवक प्रितम गेडाम, चारगावचे उपसरपंच राजू वलके, अरविंद भैसारे, अर्जुनसिंह स्वामी,अमृत चौधरी,यशवंत बोरेवार, विलास जुमनाके,माणिक गोरडवार,रामू ठिकरे,संजय घोनमोडे आदींनी निवेदन दिले.