जगात कितीही बदल होऊ द्या झाडीपट्टीमध्ये दंडारीचे महत्व अजूनही टिकून आहे. - इंजि.मंगेश पुरणनाथ मेश्राम

जगात कितीही बदल होऊ द्या झाडीपट्टीमध्ये दंडारीचे महत्व अजूनही टिकून आहे. - इंजि.मंगेश पुरणनाथ मेश्राम


एस.के.24 तास


भंडारा : मौजा मानेगाव /सडक येथे खास कार्तिक पौर्णिमेच्या मंडई निमित्त दंडारीचे आयोजन श्री.भगवानबाबा हनुमान मंदिर समिती व समस्त गावकरी यांच्या वतीने आयोजित केलेला होता.दंडार म्हणजे समाजाचं सांस्कृतिक परंपरा जपणारे लोकनृत्य. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही कलावंत दंडारीच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा कायम जपून आहेत. कामधंदा, नोकरी किंवा शिक्षणसाठी शहरांत गेलेल्या बांधवाना आपली संस्कृती दिवाळीनिमित्त गावात आल्यावर दंडार या लोकनृत्याच्या माध्यमातून पहावयास मिळतो. गाण्याच्या बोलावर व वादयाच्या ठेक्यावर चाल धरून कलावंत कला सादर करतात.


कार्यक्रमाचे उदघाटक मा. भीमरावजी गभणे, सह उदघाटक सरपंच ग्रा. पं. मानेगाव नरेंद्रजी भांडारकर, उपसरपंच ग्रा. पं. मानेगाव पंकजजी चेटुले,प्रमुख अतिथी संचालक ख. वि. लाखनी प्रा. अशोकजी चेटुले, नगरसेवक न. पं. लाखनी संदीपजी भांडारकर,प्रशांतजी गायधने, अजितजी मेश्राम, योगेशजी सिंगनजुडे, नेहालजी कांबळे, निखिल सिंगणजुडे,एकनाथजी पाखमोडे, लोकेश गायधने, हरिदासजी पाखमोडे, विनायकजी सावरकर,आनंद नस्कोलवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन आकाश निखाडे व आभार प्रदर्शन समितीचे सचिव उमेश गायधनी यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !