अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार. ★मोहघाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील घटना.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार.


★ मोहघाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील घटना.


जिल्हा प्रतिनिधी : नरेद्र मेश्राम : एस.के.24 तास 


भंडारा : येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मोहघाटा जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना रविवारी(ता.२०) उघडकीस आली. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून जांभळी नर्सरी येथे वन विभागाचे वतीने दाहसंस्कार करण्यात आले. याच बिबटाने वनरक्षक के.एस.सानप याचेवर हल्ला करून जखमी केले होते. 


        अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोक्यावर जाऊन कारवाई दरम्यान उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वन संरक्षक एस. पी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. गोखले, वनपाल डी. यू. प्रदान, वनरक्षक के.एस. सानप, के.आर. कावळे, कु. के.एस. वंजारी, ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब चे पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, मयूर गायधनी, गगन पाल, निलेश रंगारी, एनजीओ चे नदीम खान, मानद व वन्यजीव रक्षक अजहर खान,एनजीओ पी.एस.बी.एस. चे मंगेश मस्के यांचे उपस्थितीत मृत बिबट्याला शासकीय वाहनाने जांभळी नर्सरीत नेऊन पशुधन विकास अधिकारी एम.के. हेडाऊ यांचे हस्ते शवविच्छेदन करण्यात आले. मृतक बिबटाला आतून जबर मार लागला असल्याचे आढळून आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. असे निदान करण्यात आले. तथा मृत बिबटावर जांभळी नर्सरी येथे दाहसंस्कार करण्यात आले. जुलै २०२२ मध्ये हाच बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता व वनरक्षक के.एस.सानप यांचेवर हल्ला केला होता. असे वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !