टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करा,अन्यथा आंदोलनाचा इशारा - माजी सभापती,विजय कोरेवार यांची मागणी
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
सावली : टेकाडी ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद पडलेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने ती योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
वैनगंगा नदीवरील हरणघाट येथून टेकाडी ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा केला जातो.येथिल पाणी कवठी, पारडी, रुद्रापूर, चांदापुर,खेडी,चांदली बूज,टेकाडी या गावांना पुरविल्या जाते मात्र मागील सहा महिन्यांपासून पाईप लाईन लिकेज असल्यामुळे महिन्यातुन पंधरा दिवसही पाणी पोहचत नाही, आता तर पाणी पुरवठाची थकीत बिलामुळे वीजच महावितरणने कपात केली आहे.