वाहनाच्या धडकेत ठाणेगाव येथील वृध्द जागीच ठार.
एस.के.24 तास
आरमोरी : अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाणेगाव (जुने) येथील वृध्द जागीच ठार झाल्याची घटणा काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आरमोरी - गडचिरोली महामार्गावर डोंगरगांव (भू.) जवळ घडली.
गोपाळा लहू दामले रा.ठाणेगाव (६०) असे मृतकाचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होता की, मृतक गोपाळा दामले यांचा संपूर्ण शरीर चींगळलेल्या अवस्थेत होते.
अज्ञात वाहन चालकविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहेत.