उपायुक्त वाकुडकरांनी केलं शेकडो पालकांना " टेशन फ्री "

उपायुक्त वाकुडकरांनी  केलं शेकडो पालकांना " टेशन फ्री "

नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास


 चंद्रपूर  : समाजकल्याण उपायुक्त वाकुडकर यांनी स्वतः  कनिष्ट महाविद्यालयात येऊन ऑनलाईन केलेल्या प्रस्तावाचे ऑनलाईन निरीक्षण करून तिथेच जात पळताळणी प्रमाणपत्र विद्यार्थी यांना वाटपाचा करून तालुक्यातील शेकडो पालकांना मोठे सुख व समाधान दिले.


तालुक्यात सवांत मोठे कनिष्ट विज्ञान महाविद्यालय असलेल्या नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात समाजकल्याण उपायुक्त  वाकुडकरांनी तब्बल 80 विद्यार्थ्याना स्वहस्ते जात पळताळणी प्रमाणपत्र वाटप केले. जात पडताळणी  प्रमाणपत्र  ही विज्ञान विषयासह सवं विदयार्थ्यांना आवश्यक  बाब आहे. विद्याथी  यांंचेपेक्षा मोठया प्रमाणावर  पालकांना त्रासदायक असलेल्या या बाबीची दखल घेऊन  प्रत्यक्ष उपायुक्त वाकुडकरानी हजेरी लावून सवांना "टेंशन फ्री" केले. ज्या विद्याथींचे प्रस्तावात  त्रुटी आढळल्या त्यांंना सहजपणे निर्देश देऊन मार्ग मोकळा करून दिला.


याप्रसंगी नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडें,प्रा.महेश पानसे,प्रा.विजय काटकर,प्रा.सुनील कामडी,प्रा.पुस्तोडे,प्रा.सौ.उगेमुगे उपस्थित होते.हा पायंडा संपुर्ण राज्यात राबवावा ही पालकांची अपेक्षा आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !