शिधापत्रिका धारक कुटुंबाना प्राधान्य योजनेमध्ये समावेश. - शाहरुख शफी शेख,अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची मागणी.

शिधापत्रिका धारक कुटुंबाना प्राधान्य योजनेमध्ये समावेश. - शाहरुख शफी शेख,अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची मागणी.


★ तहसीलदार यांना निवेदन.


एस.के.24 तास


नागभीड : आवश्यक त्या गरजु शिदपत्रिका धारक कुटुंबाना प्राधान्य योजनेमध्ये समावेश करा तसेच अन्नपुरवठा विभाग मध्ये लोकांची कामे नेहमी उशिरा करणे तथा स्वस्थ राशन दुकाना सम्बंधित राशन वेळेवर न देने व_ उद्धत वागने या सम्बंधित राष्ट्रवादी युवक कांग्रेस नागभीड तर्फे तहसीलदार साहेब यांना आज निवेदन  सादर तहसील कार्यालय नागभीड आज दिनांक : -  30/11/2022रोज बुधवारला नागभीड शहरातिल व तालुक्यातिल बहुतांस शिदपत्रिका (राशनकार्ड) असलेल्या गोरगरीब, मोलमजुरी, शेती नसलेल्या गर्जु असलेल्या कुटुंबांना प्राध्यान्य योजने मध्ये समावेश करुण अन्नधान्य मिळाव यासाठी तसेच.अन्नपुरवठा विभागात राशनकार्ड सम्बंधित काही कामे असल्यास जे काम दोन ते चार दिवस मध्ये होतो.त्याला महीनों लावने व त्यांना वेळवेळी बोलाउन वापस पाठविने तसेच कामासाठी दिलेले कागदपत्रे इकडे तिकडे टाकून पुन्हा पुन्हा मांगने याबद्द्ल व महत्वाचा.


 स्वस्थराशन(कंटोल)दूकानामध्ये राशन घ्यासाठी गेले असता. स्वस्थ राशन दुकानदार राशन घेणाऱ्याना नंतरया, उद्या या ही वेळ आहे का हमाल नाही असी उद्धत भाषा वापरने जसे की ते राशन देऊन उपकार करित आहे.काही राशन दुकानदार तर कित्तेक वेळा दिवसभर उभा रांगेत ठेऊन तरी सुद्धा राशन देत नाही त्यांना राशन आणासाठी आपली एका दिवसाची रोजी गमवावी लगते याकरिता तहसीलदार साहेब सोबत चर्चा करुण निवेदन देण्यात आले.तसेच एक प्रतिलिपी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर यांना सुद्धा पोस्ट द्वारे पाठविण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख,तसेच शहर कार्याध्यक्ष,सचिन बनकर उपस्थित होते.

    

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !