शा.औ.प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन संपन्न.

शा.औ.प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन रासेयो  कार्यालयात संपन्न झाला.याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्रभारी गटनिदेशक बंडोपंत बोढेकर होते.रासेयो कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी प्रास्ताविक केले.


तर गटनिदेशक आनंद मधुपवार,चेतन मोहुर्ले आदींनी समयोचित विचार व्यक्त केले.सूत्रसंचालन सचिन ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीशचंद्र भरडकर यांनी केले.या प्रसंगी निदेशक श्री.समर्थ,पेटकुले,खोडे,हुलके,चुनारकर,सौ.गांगरेड्डीवार,सौ.घोरमारे,सौ.वाळके,कु.कवाडकर, कु.ताकसांडे आदींनी उपस्थिती दर्शविली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !