धनगर / कुरमार समाजाचे युवा कार्यकर्ते श्री,संतोष कंचावार यांचे दुःखद निधन.

 


धनगर / कुरमार समाजाचे युवा कार्यकर्ते श्री,संतोष कंचावार यांचे दुःखद निधन.


एस.के.24 तास


सावली : मृदुभाषी ,शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून श्री संतोष कंचावार सर सुपरिचित होते. उच्च शिकणं पूर्ण करून उदरनिर्वाह व समाजकार्य हे दोन उद्देश साध्य करण्यासाठी पोंभुर्णा या तालुक्याच्या ठिकाणी कॉम्पुटर कॅफे त्यांनी सुरू केले.



स्वतःचा व्यवसाय व स्वतःसाठी नोकरी शोधणे हे सुरू  असतानाच  विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे,उद्योग आणि इतर व्यवसाय प्रशिक्षण शिबिरात प्रवेश मिळवून देणे असे लोकोपयोगी उपक्रम ते राबवित होते.

   श्री संतोष सरांच्या प्रयत्नांना यश आले व ते स्वतः गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी येथे " संगणक शिक्षक " म्हणून रुजू झाले.व तिथेच आजपावेतो कार्यरत होते.



मागील वर्षीच " लग्न " आणि आज अचानक जगाचा निरोप घेतला.धनगर समाजाच्या प्रत्येक सामाजिक लढ्यात सहभाग घेवुन सर्वांच्या पुढे राहून धुरा समर्थपणे सांभाळणारे युवा समाज कार्यकर्ते आपल्यातून आज निघून गेले. त्यांना देवाज्ञा झाली.


  जवळपास पंधरा  दिवसांपासून श्री संतोष कंचावार  सरांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी अल्पष्या आजारामुळे त्यांना चंद्रपूर येते खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील एक आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरू असताना आज  जीवनाशी सुरू असलेली झुंज संपली व त्यांची प्राणजोत मालावली. 



श्री संतोष सरांच्या निधनानंतर खेडी व आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरलेली आहे.त्यांच्या पार्थिव शरीरावर आज दुपारी : 2 :00 वा.त्यांच्या मूळ गावी मुक्काम खेडी ता.सावली जिल्हा चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



मागील एक आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरू असताना आज  जीवनाशी सुरू असलेली झुंज संपली व त्यांची प्राणजोत मालावली. धनगर समाजाच्या प्रत्येक सामाजिक लढ्यात हिरगिरीने सहभाग दर्शविणारे युवा नेता हरपला - डॉ तुषार मर्लावार 


 
संतोषच्या निधनाने समाजात एक चांगला नेतृत्व गेला आणि त्याची कायम उणीव भासत राहील. - माजी सभापती,विजय कोरेवार 

धनगर समाजाच्या प्रत्येक सामाजिक लढ्यात सहभाग घेवुन सर्वांच्या पुढे राहून धुरा समर्थपणे सांभाळणारे युवा समाज कार्यकर्ते आपल्यातून आज निघून गेले. - खेमदेव कन्नमवार

  धनगरांचा लढवय्या नेता हरपला - रवींद्र कंकलवार

 


सर्व गुण संपन्न समाजाच्या कार्यासाठी वेळोवेळी धावून येणारे,निस्वार्थ योगदान देणारे संतोष भाऊ सर्वांना सोडून निघून गेले.समाजासाठी दुःखद घटना. - सुरेश कन्नमवार

एक संवेदनशील मनाचा होतकरू युवा समाज बांधव हरपला- नितेश मॅकलवार


आई बाबांचा लाडका तू,
    नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
    परत ये रे भावा,
    तूच तर यांच्या जीवनाचा आसरा.

शोकाकुल : - एस.के.24 तास परिवार तथा
धनगर / कुरमार समाज 

    अश्रू नयनांनी भावपुर्ण श्रद्धांजली...
 💐💐💐🌺🌺🌺🌸🌸🌸

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !