मॅजिक बस तर्फे आज जागतिक शौचालय दिवस साजरा.
एस.के.24 तास
भंडारा : मॅजिक बस इंडीया फाउंडेशन स्केल प्रकल्प,तालुका पवनी तर्फे मॅजिक बस कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध शाळांमध्ये जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मॅजिक बस चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निक्की सर व तालुका प्रकल्प व्यवस्थापक विनोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनात जागतिक शौचालय दिवस आयोजित करण्यात आला.यामध्ये शाळेतील शौचालय व्यवस्था बालपंचयात च्या माध्यमातून करण्यात आली,व सुलभ शौचालय असलेल्या शाळेच्या मुख्यध्यापक यांना बालपंचयात नी प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्देश : -
प्रत्येकाला स्वच्छतागृहाची गरज आहे आणि प्रत्येकाला स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयात (Toilet) मिळायलाच हवे. हे लक्षात घेऊन आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता नसलेल्या व्यक्तीला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शौचालयांच्या गरजेबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) साजरा केला जातो. अस्वच्छ शौचालयामुळे अनेक आजार होतात आणि अन्न आणि पाण्याच्या स्त्रोतांवरही परिणाम होतो. जागतिक शौचालय दिन हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी जागतिक स्तरावर शौचालयाशी संबंधित समस्यांबद्दल बोलून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोकांना त्याची जाणीव करून दिली जाते.
वरील विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देऊन समुदायात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व शाळेतील बाल पंचायत तसेच मॅजिक बस शाळा साहाय्यक अधिकारी वसंत पोटे व समुदाय समन्वयक पोर्णिमा भुते,रजनी सतीबावणे,जगदिश मालोदे व सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.