चनई (बू )ता. कोरपणा येथे भव्य आदिवासी मेळावा संम्पन्न.
★ आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्नशील राहणार.
★ मंत्री.सुधिरभाऊ मुंनगटीवार यांचे प्रतिपादन.
एस.के.24 तास
कोरपणा : तालुक्यातील चनई (बू) येथे दिनांक 25.11.2022 रोज शुक्रवार ला राजुरा विधानसभा भाजपा आदिवासी आघाडी,ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन शाखा कोरपणा,श्री. अरुणभाऊ मडावी मित्र परिवार चनई(बू) येथे यांचे संयुक्त विद्यमाने भव्य आदिवासी मेळावा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्याचा सत्कार कार्यक्रम कोरपणा तालुक्यातील चनई (बू) येथे संम्पन्न झाला.
या मेळाव्याचे उदघाटक: मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुंनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा हे होते.तर विशेष अतिथी म्हणून सुदर्शनजी निमकर माजी आमदार राजुरा, आशिष देवतळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कु. अल्काताई आत्राम अध्यक्षा भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा,विजयालक्ष्मी डोहे जिल्हाध्यक्षा महिला आघाडी भाजपा, वाघूजी गेडाम आदिवासी सेवक, तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी चंद्रपूर, गोंडी गायक पांडुरंग मेश्राम, रवी मेश्राम,आयोजक श्री.अरुण पाटील मडावी अध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी राजुरा विधानसभा, सौ. रेश्मा अरुण मडावी सरपंच चनई (बू),नारायण हिवरकर जिल्हा उपाध्यक्षा तथा तालूका अध्यक्ष भाजपा, सतीशभाऊ उपलेंचीवार विस्तारक भाजपा राजुरा विधानसभा, विशाल गज्जलवार,शिवाजी सेलोकर, निलेश ताजने,हरी घोरे,रमेश पाटील मालेकर,किशोर बावणे,संजय मुसळे,पुरुषोत्तम भोंगळे अमोल असेकर,आशिष ताजने भाऊराव कुळमेथे,मनोहर कुळसंगे,आनंदराव मडावी,शशिकांत अडकीने,विजय रणदिवे,ओम पवार आदी मंचावर उपस्थित होते.
कोरपणा तालुक्यातील आदिवासी बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर व प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक, व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा.ना.सुधिरभाऊ मुंनघंटीवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आदिवासी आघाडी चे जिल्हा महामंत्री प्रमोद कोडापे,जेष्ठ cfcनेते भाऊराव कुळमेथे,जेष्ठ नेते मनोहर कुळसंगे,रामदास कुमरे,मनोज आत्राम,तिरुपती कन्नाके,चंद्रभान दिनेश सूर,दिनेश खडसे,किन्नाके,सुरेश टेकाम, ज्योतीराव कोहचाळे, लक्ष्मण चाहकाटे, उमेश पेंदोर सरपंच सवलहिरा, सचिन कुळमेथे,नयनेश आत्राम,चनई चे पोलीस पाटील वामन खाडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश नांदेकर उपसरपंच सिद्धार्थ उमरे देवराव मालेकर,गावापाटील शाम कुमरे,सचिन देवतळे,अमोल खाडे, देवराव मडपती,अमोल भोयर,चनई (बू)चे सर्व ग्रामपंचायत सदस्य आदिनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहकार्य केले.