सुचवा तुमचे आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा व त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यादृष्टीने सुचवा तुमचे आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कौशल्य विकास विभाग द्वारा प्रथमतः जिल्हास्तरीय स्पर्धा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आय.एम.सी सदस्य दिनेश गोलाईत यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी नॅशनल फेलो चे गणेश चिंतकुतंलवार , गटनिदेशक आनंद मधुपवार,केशव डाबरे उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद मधुपवार यांनी करून स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. दिनेश गोलाईत म्हणाले की, सदर स्पर्धा प्रशिक्षणार्यांच्या आंतरिक गुणांचा विकास होण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यावर चालना मिळेल.
प्राचार्य संतोष साळुंके यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात आणि व्यवसाय प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयं रोजगारावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
सदर स्पर्धा शेती व्यवसाय, स्वयं रोजगार क्षेत्र, महिला रोजगार,उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञान आधारित, अन्य उपयुक्त अभ्यासक्रम या पाच विषयावर संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध संस्थेचे एकुण १९ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. स्पर्धेचे परीक्षणानुसार प्रथम पुरस्कार गणेश शेंडे (गडचिरोली) ,द्वितीय पुरस्कार रोहित नेवारे ( देसाईगंज ),तृतीय पुरस्कार (वंश इंदूरकर) तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार अजय (कुरखेडा) , लोमेश लेनगुरे (गडचिरोली) यांनी प्राप्त केला समारोपिय कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर यांनी केले आभार प्रदर्शन केशव डाबरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक, भास्कर मेश्राम, सतिशचंद्र भरडकर, विवेक गढे, उज्वल लेवडीवार, मुरारी घाटूरकर, तुषार कोडापे आदींनी परिश्रम घेतले.