मॅजिक बस मुख्य कार्यालय (हेड ऑफिस)अधिकाऱ्याची भेंडाळा येते भेट.

मॅजिक बस मुख्य कार्यालय (हेड ऑफिस)अधिकाऱ्याची भेंडाळा येते भेट.


एस.के.24 तास


चामोर्शी : विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे शाळेत मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चे मुख्य कार्यालय (Head Office)अधिकारी मा.सोनिया गांधी मॅडम आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे सर, तालुका प्रमुख मा.योगीता सातपुते यानी सर्वांनी दि. 29/11/2022 ला विश्वशांती विद्यालय येथे भेट दिली. विद्यार्थ्यांचे सत्र बघितले आणि  सर्व विद्यार्थ्यांन सोबत मॅजिक बसच्या उपक्रमाविषयी चर्चा केली व त्यांचे मत ऐकून घेतले.तसेच पालक व गावातील पदाधिकारी यांची मिटिंग घेण्यात आली.


 सोबतचं शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसोबत मिटिंग घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभ्यास कोपरा बघून विद्यार्थ्यांन मध्ये काय बद्दल होत आहे या विषयी चर्चा करण्यात आली. ही प्रमुख पाहुन्याची भेट यशस्वी होण्यासाठी मॅजिक बसचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार,रोशन तिवाडे तसेच शाळेतील शिक्षक गावातील सर्व पदाधिकारी ,पालक यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !