नानाजी विद्यालयात पालक सभेचे आयोजन.
नरेंद्र मेश्राम : एस.के.24 तास
भंडारा : आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 ला नानाजी पुडके विद्यालय जेवनाळा येथे पालक सभा आयोजित करण्यात आली .या सभेत माता पालक आणि पालक वृंद तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये पालकांनी सक्रिय सहभाग दर्शवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात आम्ही सहकार्य करू आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध मार्गदर्शनपर सूचना केल्या यात संस्थेचे सचिव आणि संस्थापक माननीय नानाजी पुडके साहेब यांनी विद्यार्थी शिक्षक व पालक हे विद्यार्थ्यांच्या विकासाचे त्रिकूट आहे असे संबोधले त्याचप्रमाणे बऱ्याच पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात भेनाथजी झलके ,डेबुजी गिरेपूजे, संतोषजी देशमुख, संतोषजी रामटेके ,परागजी पुडके तसेच खराबे सर आवर्जून उपस्थित होते आणि शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून अल्पोपहार ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.