माया वाघिणीच्या समाेर जिप्सीतून खाली पडला पर्यटक.

माया वाघिणीच्या समाेर जिप्सीतून खाली पडला पर्यटक.


एस.के.24 तास


नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) कोअर झोनमध्ये रविवारी पहाटेच्या सफारीदरम्यान अंगावर काटा येणारा प्रसंग घडला.येथे प्रसिद्ध असलेली माया वाघीण आणि तिचे शावक अगदी काही फूट अंतरावर असताना एक पर्यटक त्यांच्या जिप्सीतून खाली पडला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पडलेल्या व्यक्तीसाेबत इतरही पर्यटक हादरून गेले हाेते. प्रसंगावधान साधून सहपर्यटकांनी त्याला जिप्सीत परत आणले खरे ; पण या घटनेमुळे सफारीदरम्यानच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सूत्रांनी ‘एस.के.24 तास’ला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक राजकारणी किशोर कान्हेरे (५८) आणि इतर काही जण रविवारी सकाळी ताडाेबात सफारीसाठी गेले होते.कोलारा गेटपासून सफारीला सुरुवात झाली. कान्हेरे यांची जिप्सी पांढरपौनी परिसरात पोहोचली. तेव्हा माया वाघिणी तिच्या पिल्लासह रस्त्याने चालत होती. घटनास्थळी आणखी दोन जिप्सी आधीच हाेत्या. चांगल्या पद्धतीने व्याघ्र दर्शन व्हावे म्हणून जिप्सी मागेपुढे केली असता कान्हेरे डाव्या बाजूला असलेल्या वाहनातून खाली पडले,तसा सर्वांचा थरकाप उडाला. 



याेग्य उपाययाेजना करण्यात येतील ताडाेबाचे क्षेत्र संचालक वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी या घटनेबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील,अशी ग्वाही दिली. 


कान्हेरे यांनी सांगितले,आमच्या जिप्सी चालकाने वाघीण दिसल्यावर अचानक ब्रेक लावला.या धक्क्याने माझा तोल गेला आणि खाली पडलो. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच सुरक्षितपणे गाडीत परतल्याचे त्यांनी सांगितले.


चालकांना प्रशिक्षण आवश्यक  पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खुर्सापार गेटवर कार्यरत जिप्सी चालक व निसर्गप्रेमी दिनेश सिरसाम हे १२ वर्षांपासून सफारी जिप्सी चालवत आहे.त्यांनी महाराष्ट्र वन विभागातर्फे आयोजित चालक प्रशिक्षण सत्रात भाग घेतला आहे.सिल्लारी,पेंच याने बऱ्याच नवीन ड्रायव्हर्सना सफारीवर असताना उद्यानात काय चूक होऊ शकते आणि अशा परिस्थितीचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यात आणि समजून घेण्यात मदत झाली, असे प्रशिक्षण सर्व जंगलांमध्ये आयोजित करणे आवश्यक आहे.


सफारीला जाताना लक्षात ठेवा : -


 

- गाडी चालत असताना उभे राहू नये.


- प्रतिबंधित क्षेत्रात गाडीखाली उतरू नये.


- जंगलात कचरा टाकू नये आणि गाेंगाट करू नये.


- वन्यजीवांशी छेडछाड करू नका,त्यांना अडवू नका.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !