बहुजन वंचित आघाडी तर्फे संविधान दिवस साजरा.
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी : भंडारा
भंडारा : वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली तर्फे विश्रामगृह येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सुशीलकुमार गणवीर,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष जगदीश रंगारी ,वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुका अध्यक्ष तनुजा नागदेवे ,विद्या रंगारी,अमित नागदेवें, स्वर्णमाला गजभिये, रवींद्र गडपायले, श्रावण नदेश्वर ,इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर 26/ 11 च्या हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर भारतीय संविधानावर सामाजिक कार्यकर्ते डी.जी रंगारी, पंचायत समिती सदस्य सुशील कुमार गणवीर,रवींद्र गडपायले,जगदीश रगारी, प्रशिक मोटघरे माजी सरपंच कौशल्य नदेश्वर, इत्यादींनी आपल्या भाषणातून भारतीय संविधान किती चांगले आणि किती छान आहे यावर मार्गदर्शन केले त्यानंतर महिलांनी भारतीय संविधानावर आधारित गीत गायन केले त्यामध्ये सुवर्णलता गजभिये ,तनुजा नागदेवे, हिरा साखरे,यांनी गीतातून भारतीय संविधानाचे कौतुक केले त्यानंतर रैली काढण्यात आली व घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रशिक मोटघरे, यांनी केले तर आभार जगदीश रंगारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डी जी रंगारी ,अमित नागदेवे,तनुजा नागदेवे,विद्या रंगारी,गणेश गजभिये,रवींद्र गडपायले,उत्तमा गडपायले,कांता गजभिये,नेहा शहारे ,श्रावण नंदेश्वर ,प्रतिमा राऊत ,सविता जनबंधू,शालिनी उके,केवळराम उके, कौसल्याबाई नंदेश्वर,नाजूक मेश्राम भरपूर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.