अनुराग मुळे चैतन्य युवा पुरस्काराने सन्मानित.

अनुराग मुळे चैतन्य युवा पुरस्काराने सन्मानित.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : झाडीपट्टीतील युवा लोककलावंत अनुराग मुळे यांना चैतन्य युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन घाटकुळ ( जि.चंद्रपूर )येथे संपन्न झाले. या संमेलनात अनुराग मुळे यांना  आदर्श गाव राजगड चे शिल्पकार चंदु पाटील मारकवार, ज्येष्ठ साहित्यिक एड. लखनसिंह कटरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, एड. राजेंद्र जेणेकर, डॉ. कोकोडे,  विनोद देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.  


 अनुराग मुळे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांनी लोककला आपल्या अंगी जोपासली आहे. त्यांनी मनोरंजनातून लोकप्रबोधन ही कला साध्य केलेली असून प्रसिद्ध लोककलावंत चेतन ठाकरे यांचे मार्गदर्शन सतत मिळत आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल अनुराग मुळे यांचे डॉ.श्रावण बाणासुरे,अरूण झगडकर,रामकृष्ण चनकापूरे,संजय वैद्य,एड.सारिका जेणेकर, लुटारू मत्ते गुरुजी,श्रीकांत धोटे आदींनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !