मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लक्ष रुपयांची मदत.मृतक दीपक पेंदाम यांच्या कुटुंबीयांना.
★ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आश्वासनाची पूर्तता.
एस.के.24 तास
चंद्रपूर : सावली तालुक्यातील खेडी येथील महावितरणचे लाईनमन दीपक पेंदाम यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी त्यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन ५ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील पेंदाम कुटूंबियांना दिलेल्या वचनाची पुर्तता झाली आहे.
दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 रोजी सावली तालुक्यातील खेडी येथील दीपक पेंदाम हे महावितरण कंपनी अंतर्गत येणाऱ्या चेक हत्तीबोडी ता. पोंभुर्णा जि.चंद्रपूर हे विद्युत खांबावर चढून दुरुस्तीच्या कर्तव्यावर कार्यरत असतांना वीजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही बाब कळताच कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना मुख्यमंत्री निधीतुन ५ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्याचे आश्वासन श्री. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील पेंदाम कुटूंबियांना दिले होते. त्याअनुषंगाने श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आश्वस्त केले. सदर आश्वासनाची पूर्तता झाली असून मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई यांनी दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी या प्रकरणी ५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. यासंदर्भात दिनांक ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालयातर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र सुध्दा निर्गमित झाले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेंदाम कुटूंबियांना दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण झाला आहे.