सत्यशोधक समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊन येजगावातील युवकांनी केले महात्मा ज्योतीबा फुले ना अभिवादन.
एस.के.24 तास
मुल : क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 28/11/2022 सोमवारला माता मंदिराजवळ सायंकाळी 7.00 वाजता आदरणीय प्रसिद्ध वक्ते शिवश्री डॉ.समीर कदम सर याच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आला यावेळी कार्यक्रमामध्ये कदम साहेबानी महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजासाठी प्रयन्त केलेले होते हे पटवून दिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षे पूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांच्या कार्याला उजाळा म्हणून येजगाव इथे स्मृती दिवस करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमांचे उदघाटक.भगवानजी वाढई नायब तहसीलदार येजगाव अध्यक्ष प्रा.विजय लोनबले सर अखिल भारतीय समता परिषद अध्यक्ष विशेष अतिथी जालिद मोहुर्ले ग्रा.प.सदस्य भेजगाव नामदेव लेनगुरे प्रा.आत्राम सर प्रदीप वाढई मा.ग्रा.प.सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरिक महिला युवक शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रचंचालन शोषित खोब्रागडे यांनी केले आभार प्रदर्शन प्रदीप वाढई यांनी मानले.