रोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी - शर्ट चे वाटप.

रोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी - शर्ट चे वाटप.


एस.के.24 तास


गडचिरोली :  गावात नैसर्गिकरीत्या वातावरण  निसर्गरम्य राहावं, गाव पर्यावरण  स्नेही दिसावा ,या उद्देशाने जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी यांच्या पुढाकार्याने वृक्ष लागवड करण्यात आली होती. या वृक्ष संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या युवकांना पुन्हा सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळावी. व जास्तीत जास्त युवकांनी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे .म्हणून,गावातील बालकांना ,युवकांना कु.रोशन कोहळे ग्रा.पं.सदस्य मारोडा यांनी स्वखर्चातून प्रत्येक दिवस पाणी टाकून , झाडांची जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान म्हणून टी-शर्ट वाटप करून सत्कार केले.

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेऊन स्वखर्चाने रोशन कोहळे हे प्रत्येक वेळी युवकांचा प्रोत्साहन वाढवण्याकरिता युवकांना सामाजिक क्षेत्रात आवड निर्माण करण्याकरिता विविध प्रकारचे कार्यक्रम  घेऊन जागरूक करण्याचा प्रयत्न करत असतात.

यावेळी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे मारोडा गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश मोहूले॑ ,गिरीधर मोहूले॑, संजय गोडबोले,सुभाष मोहूले॑,गुरुदेव बारसागडे,राजेंद्र मोहूले॑,गुरुदास नागोसे,पंकज पेंदोरकर,टेमदेव कारडे यांनी वृक्ष संवर्धन करण्यासाठी मदत केल्याबद्दल रोशन कोहळे यांनी मानले आभार.


रितेश पिपरे,वेदांत मोहूले॑,अविनाश ठाकरे, विनीत मोहूले॑,विवेक ठाकरे,प्रियांशु गोडबोले, देवेंद्र पिपरे चेतन वाढई,गणेश मोहूले॑, ओमदेव कीनेकार, गणेश मोहूले॑ इत्यादी युवकांचे टी-शर्ट देऊन सत्कार करण्यात आले.


यापुढेही असे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून जो युवक किंवा विद्यार्थी  पुढाकार घेऊन उत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना 26 जानेवारी 2023 ला ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात येईल. त्यामुळे युवकांनी व विद्यार्थ्यांनी  आपल्या गावाच्या विकासासाठी सामोरे यावे .असे आवाहन मारोडा ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !