जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गडेगाव येथे जागतिक शौचालय सप्ताह साजरा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गडेगाव येथे जागतिक शौचालय सप्ताह  साजरा.


★ प्राथमिक शाळा व मॅजिक बसचे आयोजन.


★ शौचालय दिनानिमित्त उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व फाऊंडेशनचे कर्मचारी. 


नरेंद्र मेश्राम !एस.के.24 तास


भंडारा : लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे  मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व जिल्हा परिषद शाळा गडेगाव याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.


शाळेतील बालपंचायतीने पडताळा सूची चा उपयोग करून  शौचालयाची पडताळणी केली. पडताळणी नंतर बालपचायतीने मुख्याध्यापकांना शौचलयामध्ये आढळून आलेल्या सुधारात्मक बाबीबद्दल सविस्तर पत्र दिले. या वेळी कार्यक्रमाला तालुका अधिकारी रेखा चोले,शाळा सहायक अधिकारी अक्षय अंभोरे,समुदाय समनव्यक प्रिती टेंभुरने,शाळेतील मुख्याध्यापक.भूमिपाल टांगले सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !