उपद्रवी हत्ती च्या कडपाची भंडारा जिल्ह्यात एन्ट्री.

उपद्रवी हत्ती च्या कडपाची भंडारा जिल्ह्यात एन्ट्री.


एस.के.24 तास


भंडारा : साकोली वनपरीक्षेत्रातील सानगडी वनक्षेत्रात हत्तीच्या कळपाने एन्ट्री केली असून थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान केले आहे.हत्तीचा कळप सानगडी वनक्षेत्रातील झाडगाव,केसलवाडा,सिरेगाव गावाशेजारील शेत शिवारात हत्तींचा कळप शिरल्याची माहिती आहे.यात शेतकऱ्यांच्या शेतातील उभे धान पिक कापून त्याचे पुंजणे शेतात ठेवले होते.मात्र त्यानं पुंजणांची आता त्या हत्तीनी नाशधुश केली आहे.


याच हत्तींचा कळपाने मागील महिन्याभरापासून गोंदिया जिल्हात धुमाकूळ मजवला होता आणि काही इसम जखमी तर काही मृत पावले होते मात्र आता ह्याच हत्तीच्या कळपाने भंडारा जिल्हात प्रवेश केला असून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे.आता या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक राहुल गवई,सहाय्यक वनसंरक्षक राठोड, वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे, तहसीलदार कुंभरे व वनविभाग तथा महसूल विभागाची चमू सानगडी येथे तळ ठोकून आहे. हत्तीचा कळप नेमका कुठल्या दिशे कडे जाणार याविषयी संशोधन सुरु आहे.


तर महसूल व वनविभाग नुकसानीचे पंचनामे करीत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नरत आहे. हत्तीच्या एंट्रीमुळे या परिसरात भीती व त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचे लोकेशन मिळत नाही.यामुळे वनविभागापुढे आव्हान आहे. शेतात खरीप पिकांसह आता नव्याने रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.


आज रात्री शोध मोहीम वनविभाग करणार आहे.यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. तर कान्हेकर,कापगते,हटवार,चाचेरे रामकृष्ण चांदेवार या शेतकऱ्यांच्या ऊस वाडी चे नुकसान हत्तीच्या कडपा ने केले असून या कडपात ऐकुन २३ हत्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !