दारू विकतो अन् ऐश करतो असे म्हणणारे सापडले पोलिसांच्या तावडीत. ★ दुचाकीसह ५३ हजारांची दारू जप्त.

 


दारू विकतो अन् ऐश करतो असे म्हणणारे सापडले पोलिसांच्या तावडीत.


★ दुचाकीसह ५३ हजारांची दारू जप्त.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! S.K.24
 TAAS


गडचिरोली : अवैधरित्या दारू तस्करीप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या (डीबी) पथकाने दुचाकीसह ५३ हजारांची दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोर्ला कुडेसावली वैनगंगा नदीघाट परिसरात केली. याप्रकरणी एका अल्पवयीनासह दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये सोनू रमेश बांगरे (२५) रा. पोर्ला याच्यासह एका १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे.


गडचिरोली पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या पोर्ला- कुडेसावली नदी घाटावरून अवैधरित्या दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, परशुराम हलामी यांनी नदीघाट परिसरात सापळा रचला. दरम्यान दुचाकीने दारूची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. सदर कारवाईत ६ हजारांची देशी दारू, ४७ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
.

इंदाळा टोली येथील विनोद नामदेव खोब्रागडे याच्या घरी विदेशी दारू असल्याची माहिती प्राप्त होताच सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोरे, उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, कर्मचारी कोसनकर यांच्या पथकाद्वारे धाड टाकली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !