गुरवळा नेचर सफारी पर्यटकांसाठी खुली.

गुरवळा नेचर सफारी पर्यटकांसाठी खुली.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : वनविभागा अंतर्गत निसर्ग पर्यटनला चालना देण्यासाठी व स्थानिक वनपर्यटनातून रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने सुरू करण्यात आलेली गुरवळा नेचर सफारी आज दिनांक 25/11/2022 ला मा.डॉ.किशोर मानकर सर वनसंरक्षक गडचिरोली वणवृत्त गडचिरोली यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सफरीची सुरवात करण्यात आली.

गुरवळा नेचर सफारी उदघाटन करतांना...मा.डॉ.किशोर मानकर सर

नेचर सफारीच्या उद्घाटन प्रसंगी वनपर्यटनातून आर्थिक प्रगती साधून गावविकास करावे असे प्रतिपादन मा.डॉ.किशोर मानकर सर यांनी केले .तसेच वन्यजीवांच्या व वनांच्या सवर्धनासाठी वनविभाग कटिबध्द आहे व त्यासाठी वनविभाग सर्वोतोपरी प्रयत्न करेल.तसेच नेचर सफारीला पर्यटकांचं उत्फुर्ती प्रतिसाद मिळत असल्याने मा. मिलिश शर्मा सर उपवसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांनी समाधान व्यक्त केले.

उद्घाटन सोहळा श्री.मा.डॉ.किशोर मानकर सर वनसंरक्षक वनवृत्त गडचिरोली,श्री.मा.मिलीश शर्मा सर उपवसंरक्षक वनविभाग गडचिरोली यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री.मा.सोनल भडके सर सहा-वनसंरक्षक रोहयो गडचिरोली वनविभाग,अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली,दर्शना भोपये सरपंच ग्रा.प.गुरवळा,श्री. प्रकाश बांबोळे उपसरपंच ग्रा.प.गुरवळा,श्री.निलेश गेडाम अध्यक्ष स.व.व्य.समिती गुरवळा,रमेश मेश्राम अध्यक्ष स.व.व्य.स.हिरापुर,छायाताई बांबोळे,रमेश तुरे सदस्य JFM समिती गुरवळा,रायपुरे सर नवयुग विद्यालय गुरवळा उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजय जनबधू क्षेत्रसहायक गुरवळा,श्री.गुरू वाढई वनरक्षक गुरवळ श्री.दुर्गमवांर वनरक्षक गुरवळा,प्रियंका रायपुरे वनरक्षक गुरवळा, संपूर्ण वन कर्मचारी तसेच गुरवळा नेचर सफारी गाईड यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !