सुपुष्पमंगल संस्थेच्या वतीने माणुसकीची दोरी उपक्रमांतर्गत गरजूंना कपड्याचे वितरण.
एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील पिपरी दीक्षित येथे सुपुष्पमंगल बहुउद्देशीय संस्था येरगाव यांचे वतीने माणुसकीची दोरी उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू लोकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.सुपुष्पमंगल बहुउद्देशीय संस्था ही विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असते. अत्यंत गरीब व गरजू लोकांना कपड्यांचे वितरण दरवर्षी संस्थेतर्फे केल्या जाते.याही वेळेस कपड्याचे वाटप करण्यात आले.
माणुसकीची दोरी या उपक्रमाचे जनक किरण नागापुरे यांच्या संकल्पनेतून गोरगरीब अत्यंत गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना कपड्यांची गरज भागविण्याकरता हा स्तुत्य उपक्रम तयार करण्यात आला उपक्रमाचा नागरिक मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत.
वापरण्यास योग्य आहे पण आपण वापरत नसलेले वस्तु, कपडे एकत्र करून त्या वस्तु "माणुसकीची दोरी" या उपक्रमाच्या माध्यमातुन गरजु लोकांपर्यत विनामुल्य पोवचविण्याचे माणुसकीची दोरी या उपक्रमा अंतर्गत कपड्याचे वितरण करताना संस्थेचे अध्यक्ष मंगलदास मशाखेत्री, माणुसकीची दोरी या उपक्रमाचे जनक किरण नागापुरे आदी सदस्य उपस्थित होते.