बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर द्वारा बेंबाळ येथे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न.
★ तज्ञ डॉक्टरांकडून हजारो रुग्णांनी घेतला या आरोग्य सेवेचा व निशुल्क औषधोपचाराचा लाभ.
नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : स्वर्गीय लोडबाजी पाटील वाढई व स्वर्गीय कमलाबाई लोडबाजी पाटील वाढई स्मृतिप्रीत्यर्थ भव्य निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन बेंबाळ येथे करण्यात आले.बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर द्वारा स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, तसेच जनरल प्रॅक्टिशनर तज्ञ डॉक्टरांकडून विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथे तपासणी तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आली.
"मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा" या संकल्पनेतून बेंबाळ परिसरातील रुग्णांना मोफत आरोग्यसेवेचा चा लाभ मिळावा याकरिता परिसरातील प्रतिष्ठित नागरिक दिपक लोडबाजी पाटील वाढई यांच्या नेतृत्वात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला जवळपास ११०० रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. सदर महाआरोग्य शिबिराला नागपुरातील तसेच चंद्रपुरातील सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध किडनी सर्जन डॉक्टर संजय घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराला डॉ. राजू शेंडे, डॉ. रुपेश सोनडवले, बालरोगतज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. देवेंद्र लाडे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील मल्लोजवार, डॉ. प्रतिक कावळे, प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. विनोद माहुरकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ.अमित गुरनुले, मूत्रविकार तज्ञ डॉ. कुंदन वाढई, डॉ. पंकज गणवीर, मेंदू रोग तज्ञ डॉ. कपिल गेडाम, किडनी सर्जन डॉक्टर महेश बोरीकर, हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल नगराळे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. राकेश गावतुरे, आयुर्वेद तज्ञ डॉक्टर राजू ताटेवार, डॉ.राकेश वनकर, डॉ. विद्या राणे, दंतरोग तज्ञ डॉ.स्नेहल खोब्रागडे, जनरल फिजिशियन डॉ.तीरथ उराडे डॉ.अमेय झरकर, डॉ.आकाश तुराले, डॉ.सीमा बांबोळे, डॉक्टर फरहाद काझी, डॉ. रोशनी गायकवाड, डॉ. वैभव नागोसे, डॉ. प्रणित भगत, औषधी व्यवस्थापक निधी निगोडे इत्यादींच्या उपस्थितीत या महाआरोग्य शिबिरात रुग्णांना सेवा देऊन निशुल्क औषधी उपचार दिले. सदर महाआरोग्य शिबिराचे यशस्वीरित्या नियोजन दिपक लोडबाजी वाढई, प्रशांत उराडे, पवन नीलमवार, चांगदेव केमेकार, विजय बोम्मावार, किशोर पगडपल्लीवार, किशोर नंदिग्रामवार, पराग वाढई, दीपक कोटकले, उमाकांत मडावी, लवसन वाढई, अलिफ शेमले, विनोद चुधरी, गणेश नीलमवार, मदन उराडे, दिवाकर कडस्कार, देवाजी ध्यानबोईवार, विनोद वाढई, राकेश आउलवार, डॉ. राकेश कुंभारे, रंजीत गेडाम, कृष्णा देशमुख, सचिन वाळके, सुरेश झाडे, नितीन मोहर्ले, विवेक चनकापुरे, धनंजय आकनुरवार, तसेच परिवर्तन पॅनलचे इतर सदस्य व विवेकानंद विद्यालय कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.