कांतापेठ,टोलेवाही,भगवानपुर,परिसरात भरात आलेल्या धान पिकाची रानटी डुकराचा हैदोस.
राजेंद्र वाढई!कार्यकारी संपादक!एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील कांतापेठ,टोलेवाही,भगवानपुर, परिसरात भरात आलेल्या धान पिकाची रानटी डुकराचा हैदोस शेतकऱ्याच्या शेतातील धान पिक जंगली डुकराच्या कळपाने पूर्णतः भूई सपाट करीत आहेत.
शेतकऱ्याचे खुप नुकसान होत आहे.रानटी डुकराच्या कळपाने हैदोस घालून धानपिक जमीन दोस्त केली आहे.शेतकरी शेतावर गेल्यावर त्यांना हा प्रकार दिसून येत आहे. त्यांनी सांगितले आहे. शेतमालास मिळणारा अपुरा भाव व शेतीला लागणारा खर्च यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे.शेतकरी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे आपल्या पिकाचे रक्षण व सांभाळ करीत असतात.
शेतकरी तोंडी माहिती वन विभागाला दिलेली आहे. पिढीत शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वनविभाग कडे करीत आहेत.वनविभागाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे.