वाघाचा हल्यात शेतकरी महिला ठार. ★ वाघाची दहशत मात्र कायम. ★ नागरिकांची वाघाला बंदोबस्त करण्याची मागणी.

वाघाचा हल्यात शेतकरी महिला ठार.


★ वाघाची दहशत मात्र कायम.


★ नागरिकांची वाघाला बंदोबस्त करण्याची मागणी.


राजेंद्र वाढई!एस.के.24 तास


मुल : मुल तालुक्यातील कांतापेठ मध्ये कापूस काढण्याकरिता गेली असता महिलेवर वाघाने हल्ला केला जागीच तिला ठार केलं जानाळा शेतशिवारा जवळील वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 523 मध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली श्रीमती कल्पना अरुण लोणबले वय,45 वर्ष मुल तालुक्यातील मौजा कांतापेट येथील श्रीमती कल्पना अरुण लोणबले ह्या शेतामध्ये कापूस काढण्याकरिता गेले होत्या दबा धरून बसलेल्या वाघाने कल्पनावर हल्ला करून जागीच ठार केले सदर घटनेची माहिती होताच वन विकास महामंडळाचे सहा व्यवस्थापक खामकर साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी पिंजारी साहेब क्षेत्र सहाय्यक राकेश कुंभरे साहेब मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,सतीश सिंग राजपूत साहेब पठाण साहेब चिरोली ज्ञानबोनवार साहेब चिरोली गणेश मेश्राम चिरोली संजय जुमनाके  पोलीस स्टेशन मुल घटनास्थळी दाखल होऊन शव उत्तरेस तपासणी करिता मुल सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !