स्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार ठार,एक जखमी.
एस.के.24 तास
भद्रावती : गाडी वळवताना मागून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसून असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला,तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी शहरातील सुमठाणा परिसरात भद्रावती - चंद्रपूर हायवेवर घडली.
शंकर धोंडूजी निखुरे (५०) रा.जळका खरवड असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात कार्तिक वसंता मोहुर्ले (२४) हा चालक गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.कार चालकाला पोलिसांनी अटक केली.